मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे नाणार प्रकल्प विरोधक संतप्त
महा जनादेश यात्रेच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत पुनर्विचार केला जाईल असे वक्तव्य केल्याने नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
नाणार परिसरातील प्रकल्प विरोधकांनी डोंगर दत्तवाडी एकत्र येत मुख्यमंत्री फडणवीस व प्रकल्प समर्थकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. रिफायनरी प्रकल्प परत आणण्याचा प्रयत्न झाला तर आक्रमक पद्धतीने आंदोलन छेडले जाईल असे सांगून आमच्या नादाला न लागण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला. यावेळी कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेचे नेते उपस्थित होते.
www.konkantoday.com