
सह्याद्रीच्या कुशीतून आलेला राजा – बेलारी बुद्रुक येथील हापूस आता बाजारात! सेंद्रिय हापूसची राम नवमी निमित्त लागली मुहूर्त बोली – देवरुख करतोय नवा इतिहास!
प्रकृतिका फार्म्सच्या सेंद्रिय हापूस आंब्याला राम नवमीला सुवर्णमुहूर्त झाला.

आधुनिक शेतकरी अनुप आणि नीलिमा दिघे यांच्या प्रयत्नांना फळ मिळाले आहेसंगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळील बेलारी बुद्रुक येथील प्रकृतिका फार्म्स मधील आधुनिक शेतकरी अनुप दिघे आणि नीलिमा दिघे यांनी आपल्या सेंद्रिय हापूस आंब्याच्या पहिल्या तुकडीची काढणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
विशेष म्हणजे राम नवमीच्या पावनदिनी या सेंद्रिय हापूस आंब्याच्या विक्रीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
देवरुख परिसरात सह्याद्रीच्या कुशीत होणाऱ्या हापूस आंब्याविषयी अनेक गैरसमज होते.या भागात आंबा उशिरा येतो, त्याची चव आणि गुणवत्ता कमी असते, रासायनिक फवारणीशिवाय आंबा शक्यच नाही…_ *पण या सर्व समजुतींना खोडून काढत दिघे दाम्पत्याने केवळ जैविक खते आणि नैसर्गिक घटकांच्या सहाय्याने संपूर्ण सेंद्रिय हापूस आंबा उत्पादनात यश मिळवले आहे.या आंब्यांची खासियत म्हणजे जुन्या काळातील
*खुंटी कलमाच्या झाडांवर हे आंबे लागले असून, कोणत्याही रासायनिक वापराशिवाय लवकर तयार झाले आहेत. *त्यामुळे चव, सुवास आणि पोषणमूल्याच्या बाबतीत हे आंबे इतरांपेक्षा सरस ठरत आहेत.राम नवमीच्या दिवशी, देवरुखमध्ये खास कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या हापूस आंब्याच्या विक्रीचा मुहूर्त मुहूर्ताची बोली लावण्यात आली या सेंद्रिय आंब्याला बाजारपेठेत भक्कम ओळख मिळवून देण्याचा उद्देश आहे.प्रकृतिका फार्म्सचा हा प्रयत्न नक्कीच इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरणार आहे — कारण निसर्गाशी सुसंवाद साधत, आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाचा संगम साधून सेंद्रिय शेतीतूनही उत्तम उत्पादन शक्य आहे, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
संपर्क *नीलिमा दिघे देवरुख* :- *9951499858*