गुहागरमध्ये लेदर फुटवेअर क्लस्टरला मान्यता
गुहागर तालुक्यातील पडवे येथे लेदर व फुटवेअर क्लस्टरला सरकारने मान्यता दिली आहे सव्वीशे कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे कोकणचे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी हा प्रकल्प कोकणात यावा यासाठी यासाठी प्रयत्न केले होते केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून हा प्रकल्पाचा गुहागर तालुक्यातील पडवे येथे उभारण्यात येणार आहे
लेदर आणि फूटवेअर उत्पादनामध्ये चीन नंतर भारताचा क्रमांक लागतो या ठिकाणी प्रकल्प उभा राहिल्यास मोठा रोजगार उपलब्ध होईल तसेच कोकण ही मोठी बाजारपेठ म्हणून उदयाला येईल यासाठी केंद्राकडून मोठ्या सवलती मिळणार आहे
जागतिक लेदर उत्पादनात भारताचा मोठा वाटा असून या उद्योगामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे हाउद्योग कोकणात सुरु झाल्यास कोकणत रोजगार उपलब्ध होईल व आर्थिक विकास होईल हा प्रकल्प कोकणात आणण्यास माजी मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल सामाजिक नेते अॅडव्होकेट विलास पाटणे यांनी प्रभू यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत