काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनीच शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासाठी काम केले -रमेश कदम यांचा घणघाती आरोप

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासाठी खासदार हुसेन दलवाई यांनी काम केले.एवढेच नव्हे तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तडजोड झाली असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी केला आहे.याचे सर्व पुरावे आपण पक्षाकडे सादर केल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना निवडणुकीचा अनुभव नसताना जाणीवपूर्वक त्यांची उमेदवारी लादली गेली त्याचे खरे सूत्रधार खासदार हुसेन दलवाई हेच आहेत.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला.
अजूनही वेळ गेलेली नाही पक्ष संघटना वाढवायची असेल तर पक्षाला आपल्या तक्रारीची दखल घ्यावी लागेल असेही कदम यांनी सांगितले.
आपल्याला जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू दिला, पक्षाने काढल्याचे वारंवार बोलले जाते मात्र प्रत्यक्षात आपणच पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button