शौचालयाची दुरावस्था दूर करा,स्वाभिमान संघटनेची मागणी
रत्नागिरी शहरातील गाडीतळ भागात असलेल्या शौचालयाची दुरावस्था झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्वाभिमान पक्षाचे शहराध्यक्ष विजय गांधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.या शौचालयाची दुरावस्था झाली असून त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तेथे जाणे कठीण होऊन बसले आहे.या भागात बँका व शाळा असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.शिवाय या ठिकाणी पसरलेल्या दुर्गंधीमुळे त्याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना होत आहे. याबाबत नगर परिषदेला आदेश देण्यात यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com