
विजेचा शॉक लागल्याने प्लंबरचा मृत्यू
घरामध्ये प्लंबिंगचे काम करण्यासाठी आलेला प्लंबर महेश परशुराम दाते राहणार खेर्डी यांच्या हातातील लोखंडी शिडीचा स्पर्श विद्युत वाहिनीला झाल्याने त्याचा मृत्यू झाला.ही दुर्घटना चिपळूण तालुक्यातील
चिंचघर येथे घडली.
चिपळूण तालुक्यातील सती चिंचघर येथे राहणारे नानासाहेब केंगार यांच्या घरी प्लंबिंगचे काम करण्यासाठी महेश दाते हा प्लंबर आला होता.घराच्या मागील बाजूस प्लंबिंगचे काम करण्यासाठी दाते याने हातात लोखंडी शिडी घेतली होती.ती कामाच्या ठिकाणी नेत असतात या शिडीचा स्पर्श त्या ठिकाणाहून जाणाऱ्या अकरा केव्हीच्या महावितरणाच्या ओव्हर हेड वायरला झाला.त्यामुळे प्लंबर दाते यांचा जागीच मृत्यू झाला.
www.konkantoday.com