
वाटद खंडाळा एमआयडीसीबाबत म्हाडाचे अध्यक्ष आ.उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली उद्योगमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटले ,तर जनसुनावणी न घेतल्यास मतदानावर बहिष्कार
वाटद खंडाळा येथे होणाऱ्या नियोजित एमआयडीसीबाबत ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे यासाठी म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत व राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. एमआयडीसी करताना नागरिकांना विश्वासात घ्यावे व त्यांची घरे विस्थापित होऊ नये अशी मागणी त्यांनी केली यावेळी या शिष्टमंडळात चंद्रकांत धोपट, संतोष शिर्के,सहदेव वीर, संतोष निंबाळकर, विजय चौगुले,दिलीप वीर,योगेंद्र कल्याणकर,अवधूत मुळे आधी जण सहभागी झाले होते.या नियोजित एमआयडीसीला वाटद भागात विरोध सुरू झाला आहे. एमआयडीसी उभारताना स्थानिक ग्रामस्थांना कोणतीही कल्पना न देता ती लादण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. एमआयडीसी होण्याचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच जमीन दलालानी जमिनी खरेदी केल्या आहेत.ही एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. यामुळे एमआयडीसीने काढलेली अधिसूचना रद्द करावी व यासाठी जनसुनावणी घ्यावी अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय वाटद मिरवणे ग्रामसभेत घेण्यात आला आहे.यामुळे नाणार पाठोपाठ आता वाटद एमआयडीसीचा नवा वाद सुरू झाला आहे.
www.konkantoday.com