राष्ट्रवादी पक्षाची शिवस्वराज्य यात्रा गुहागर येथेही येणार
गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेत गेल्याने गुहागरमधील राष्ट्रवादी संपली असे अनेकांना वाटत असले तरी तसे प्रत्यक्षात होणार नाही उलट राष्ट्रवादीची मोट नव्याने परत बांधण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी दिली. गुहागर राष्ट्रवादीचे कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येईल. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील गुहागरकडे लक्ष्य ठेवले असून रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर शिवस्वराज्य यात्रा येणार आहे.ही यात्रा दापोली,चिपळूण व शृंगारतळी येथे येणार आहे.या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, खासदार अमोल कोल्हे,खासदार सुनील तटकरे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
www.konkantoday.com