रत्नागिरी जिल्ह्याची तहान भागवून कोयनेचे अवजल जिल्हय़ाबाहेर न्यावे -उपाध्यक्ष विक्रांत आंब्रे
रत्नागिरी जिल्ह्यातील कोयनेचे अवजल वाया जात आहे. जिल्ह्यातील शेतकरी त्याचा सिंचनासाठी उपयोग करून घेत नाहीत.कोयनेच्या अवजलातील पाणी रत्नागिरी जिल्ह्याची तहान भागवून ते जिल्हा बाहेर नेण्यास आमची कोणती हरकत नाही असे मत कोकण पाटबंधारे विभाग महामंडळाचे उपाध्यक्ष विक्रांत आंब्रे यांनी व्यक्त केले. चिपळूण तालुक्यातील तिवरे दुर्घटनेत तांत्रिक बाबी जबाबदार आहेत. परंतु त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांची कमतरता हे देखील एक कारण असल्याचे त्यांनी सांगितल। जिल्ह्यातील ११ धरणांसाठी तीन कोटी रुपयेचे प्रस्ताव करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com