रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित ,विमानतळ कार्यान्वित होणार ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रत्नागिरीत घोषणा
महा जनादेश यात्रेच्या निमित्ताने रत्नागिरीत आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रत्नागिरीत झालेल्या जाहीर सभेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.निसर्ग समृद्धी लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा जाहीर करावा अनेक वर्षांची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केली व रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली. रत्नागिरीतील विमानतळाच्या विस्तारीकरण कामाचे काम सुरू असून या विमानतळाला उड्डाण योजने खाली घेतले असून हे विमानतळ लवकरच सुरू होईल व येथून थेट विमानाने देशाशी संपर्क साधता येईल असे त्यांनी सांगितले.मुंबई गोवा महामार्गाचे काम पावसानंतर वेगाने सुरू होईल हा मार्ग कोकणातील पर्यटनाला लाईफलाईन ठरेल असे त्यानी सांगितले. तसेच रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे एमआयडीसी उभी करण्यात येणार असून त्यामुळे तेथे उद्योग येऊन स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्य़ात पाच वर्षांच्या काळात सोळाशे किमीचे रस्ते बनविण्यात आले. श्रीक्षेत्र गणपतीपुळे च्या विकासासाठी कोटय़ावधी रुपयांच्या आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय मच्छीमार व कोकणातील शेतकर्यांसाठी भरीव काम केले आहे.
गेली अनेक वर्षे गाजत असलेल्या नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आहे.आता या प्रकल्पासाठी समर्थन पाहून याबाबत फेरविचार केला जाईल असेही त्यानी सांगितले.हा प्रकल्प झाला तर एक लाख लोकांना रोजगार मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. एकूणच रत्नागिरी दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणांचा पाऊस पाडला.
www.konkantoday.com