
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल कर्तव्यदक्ष अधिकारी -जि.प सदस्या साै.नफिसा परकार
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अांचल गोयल या कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पणे काम करणाऱ्या अधिकारी आहेत असे मत सुसेरी जिल्हा परिषद सदस्या साै.नफिसा परकार यांनी व्यक्त केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कोणत्याही राजकीय परिस्थितीत दबावाखाली काम करीत नाहीत.यामुळे संबंधितांना स्वतःचे हित साध्य करता येत नसल्याने त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.मुख्य कार्यकारी अधिकारी आपले कर्तव्य बजावत असताना निपक्षपाती वागत आहेत.त्यामुळे जिल्हा परिषद कारभारात शिस्त आली आहे व कामाचा दर्जा वाढला आहे.त्यामुळे त्यांच्यावरील अविश्वास ठराव रद्द करण्यात यावा अशी आपण मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com