गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले,दोघांना वाचवण्यात यश एक बेपत्ता

गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या इस्लामपूरमधील तीन जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता समुद्राचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. आरडाओरड झाल्यावर जे जीवरक्षकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे मात्र त्यातील एकजण खोल समुद्रात बेपत्ता झाला आहे.पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले.बेपत्ता झालेल्याचे नाव सुनील आदिमणी असल्याचे कळते त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.काल देखील दोन जणांना बुडताना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले होते.गणपती पुळे येथील समुद्रातील काही भाग धोकादायक आहे. वारंवार सूचना करूनही पर्यटक न ऐकता खोल समुद्रात जात असल्याने अशा दुर्घटना घडत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button