कुणबी आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटलांची नियुक्ती
शामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील यांची शासनाने नियुक्ती केली आहे. कोकणातील कुणबी समाजासाठी एक महत्त्वाचे महामंडळ म्हणून शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाची ओळख आहे.विश्वनाथ पाटील हे कुणबी सेनेचे अध्यक्ष आहेत.कुणबी समाजासाठी ते गेली अनेक वर्षे काम करीत आहेत.शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळासाठी सध्या ५० कोटींची तरतूद केली आहे.या महामंडळावर पाटील यांची नेमणूक केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
www.konkantoday.com