कचरा शुल्क व दंड प्रकरणी रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने नगराध्यक्ष व सदस्यांना विश्वासात घेतले नाही
रत्नागिरी शहरात राबवण्यात येणाऱ्या कचरा शुल्क व दंडाबाबत रत्नागिरी नगर परिषदेच्या /प्रशासनाने व आरोग्य विभागाने खुद्द नगराध्यक्षांना देखील विश्वासात घेतले नसल्याचे आता उघड झाले आहे.कचरा प्रकरणी नुकतीच नगर परिषद प्रशासनाने वृत्तपत्रातून जाहिरात देऊन नागरिकांना दंड व शुल्काची माहिती दिली आहे यामुळे नागरिकांच्या नाराजी निर्माण झाली होती याबाबत नगराध्यक्ष बंड्या साळवी यांना देखील प्रशासनाने कोणतीही कल्पना दिलेली नाहीत्यामुळे अशा प्रकारचा दंड व शुल्क आकारण्यात येणार आहे हे नगराध्यक्षांना पेपरमध्ये आलेल्या जाहिरातीतील माहितीवरून कळले आपणाला याबाबत प्रशासन किंवा आरोग्य विभागाने काहीही कल्पना दिली नाही जर नागरिक आरोग्य शुल्क भरत असतील तर त्यांना ही सेवा देणे पालिकेची जबाबदारी आहे तरी देखील याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तो सर्वसाधारण सभेपुढे येणे आवश्यक होता तसे न होता आरोग्य खात्याने ही निविदा काढलीच कशी असा सवाल करून नगराध्यक्ष यांनी सर्वसाधारण सभा होईपर्यंत ही निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com