अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी मृणाल झापडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर तरुणाची पीडित मुलीची ओळख झाली होती.त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. सदर मुलीला आपल्या बोलेरो ट्रकमधून फिरावयास नेऊन तेथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.हा प्रकार मुलीने घरात सांगितल्यावर या मुलींच्या पालकांनी रत्नागिरी पोलीस स्थानकात आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केल्यावर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com