महिलांच्या आरोग्यासाठी चिपळूण नगरपालिकेचा पुढाकार
महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेला हातभार लावण्यासाठी चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साै.सुरेखा खेराडे यांनी चिपळूण शहरात तीन ठिकाणी चार सॅनेटरी नेकपिन वेंडिंग मशीन बसवली आहेत.साै.खेराडे यांनी महिलांच्या आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व देत राखीव निधीतून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन महत्त्वाचे आहे.परंतु अनेक वेळा सेनेटरी नेकपीन कचऱ्यात किंवा स्वच्छतागृहात टाकले जातात ते चुकीचे आहे.यासाठी त्या ठिकाणी सेनेटरी नेकपिन इन सिनरेटर मशिन बसवण्यात आले आहेत.त्यामध्ये नेकपिन जाळून तेथे त्याचे राखेत रुपांतर करण्यात येते.शहरात आणखी काही ठिकाणी अशी मशिन्स बसवली जाणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण नगरपालिकेने महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्व पूर्ण पाऊल उचलल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
www.konkantoday.com