महामार्गावरील चिखलाने दुचाकीस्वाराचा बळी घेतला
मुंबई गोवा महामार्गावर खेड मध्ये भोस्ते घाटातून जाणाऱ्या स्कूटर स्वाराला ट्रकने मागून धडक दिलेल्या अपघातात स्कूटर स्वार प्रभाकर घोठल हा गंभीर जखमी झाला होता.त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला यातील प्रभाकर हा आपली दुचाकी घेऊन चिपळूणहून खेडच्या दिशेने जात होता.महामार्गावर चिखल झाल्याने त्याने आपले दुचाकीचा वेग कमी केला परंतु मागून आलेल्या ट्रक चालकाचा ब्रेक न लागल्याने त्याने या स्कूटर स्वाराला मागून धडक दिली व ट्रक चालकाचाही ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक विरुद्ध बाजूला जाऊन गटारात कोसळला. या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु उपचाराच्या दरम्यान त्याचे निधन झाले.
www.konkantoday.com