बनावट कंपनी काढून दहा वर्षे फरारी झालेल्या आरोपीला अटक
बनावट कंपनी स्थापन करून त्यामध्ये लोकांना गुंतवणूक करायला लावून त्यानंतर फरारी झालेल्या गिरीधर मोरे या आरोपीला पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. यातील मोरे याने २००८ साली एक कंपनी स्थापन केली त्यामध्ये मोठ्या रकमेचे आमिष दाखवून लोकांना त्यामध्ये गुंतवणूक करायला लावली त्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे न देता आरोपी फरारी झाला.त्याला काही काळाने अटक करण्यात आली होती. तो जामिनावर सुटला होता.त्यानंतर दहा वर्षे आरोपी फरार होता तो पुणे येथे घरात असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केले.
www.konkantoday.com