आमदार उदय सामंत यांच्या परममित्र बॅनरने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महा जनादेश यात्रेच्या निमित्ताने रत्नागिरी शहरात येत आहेत. त्यांची रत्नागिरी शहरात जाहीर सभा होत आहे.त्यांच्या स्वागतासाठी भाजपसह ,नारायणराव राणे यांच्या स्वाभिमान पक्ष व शिवसेनेच्या वतीने बॅनर लावण्यात आले असले तरी म्हाडाचे अध्यक्ष व शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांच्या परममित्र बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.या बॅनरवर माझे परममित्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे रत्ननगरीत स्वागत आहे.असा मजकूर आहे.बॅनरवर आमदार उदय सामंत व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांचे फोटो असून फलकावर सामंत यांच्या फोटोच्या येथे शिवसेनेचे धनुष्यबाणाचे तर मुख्यमंत्र्यांच्या फाेटाे येथे कमळाचे चिन्ह आहे.शहरात ठिकठिकाणी हे बॅनर उभे करण्यात आल्याने नागरिकांचे लक्ष वेधले आहे.तर दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी व गुहागर जागेसाठी भाजप आग्रही असल्याचे म्हटले होते. मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ घेणार असल्याचे त्यानी सांगितले होते.आता परममित्र बॅनरमुळे आमदार सामंत यांची बाजू वरिष्ठ पातळीवर भक्कम असल्याची चर्चा आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button