
अाशा प्रवर्तकांना न्याय मिळाला मानधनवाढीचा जीआरचे विजयी मेळाव्यात स्वागत
आपल्या मानधनात वाढ मिळावी यासाठी गेली अनेक दिवस लढा देणाऱ्या आशा प्रवर्तकांना आता मानधनात वाढ झाली आहे.त्यांना आता चार हजार रुपये मानधन मिळणार आहे
आपल्या मानधनाच्या वाढीसाठी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने आंदोलने सुरू होते. यासाठी राज्यस्तरावर आंदोलन करण्यात आले होते.शेवटी त्यांच्या मागण्यांची दखल शासनाने घेऊन त्यांच्या मानधनात वाढ केली.पूर्वी त्यांना दोन हजार मानधन दिले जात होते.आता नव्या जीआरप्रमाणे त्यांचे मानधन चार हजार रुपये झाले आहे.तसा शासनाने जीआर काढल्याची माहिती आज रत्नागिरीत झालेल्या आशा प्रवर्तकांच्या विजयी मेळाव्यात संघटनेच्या राज्य चिटणीस सुमन पुजारी यांनी दिली या निर्णयामुळे अाशा प्रवर्तकानी आनंद व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com