अन्यथा मृतदेह देवरुख सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठेवणार : सर्वपक्षीयांचा ईशारा
दिलेली मुदत संपूनही देवरूख रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या शवविच्छेदन कक्षाचे बांधकाम करण्यात आलेले नाही त्यामुळे मृतदेह संगमेश्वर येथे शवविच्छेदनासाठी न्यावा लागतो यामुळे मृतांच्या नातेवाईकांना मनस्ताप होत आहे.
देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे काम सुरु झाल्याने शवविच्छेदन कक्ष पाडण्यात आला होता.आता तेथे शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे देवरुखात आणलेल्या मृतदेहाना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागते. यात वेळ, पैसा आणि नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. हा कक्ष पाडल्यानंतर तो उभा करण्याची मुदत संपली. त्यामुळे सर्वपक्षीयानी आवाज उठवला आहे.
यामध्ये राष्ट्रवादीचे बारक्याशेठ बने, बाळु ढवळे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, मनसेचे अनुराग कोचिरकर, पत्रकार सुरेश सप्रे आदीनी दिली बांधकाम विभागावर धडक मारली व अधिकाऱ्यांना जाब विचारला.येत्या महिनाभरात हे काम पूर्ण करावे अन्यथा मृतदेह बांधकाम खात्याच्या कार्यालयात आणून ठेवण्यात येतील असा इशारा देण्यात आला.
www.konkantoday.com