राजापूरमध्ये सर्व प्रकल्पांना विरोध होत असतानाच मिनी एमआयडीसीची उद्योगमंत्र्यांची घोषणा
राजापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला, रिफायनरी प्रकल्पाला विरोध असतानाच तालुक्यातील बारसू व साेलगावमध्ये मिनी एमआयडीसी उभी करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजापूर येथे केली.जन यात्रेच्या निमित्ताने युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे रत्नागिरी दौर्यावर आले होते.त्यांचे बरोबर उद्योग मंत्री आले होते.राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव शिवणे गाेवळ या परिसरात ९३६हेक्टर जमिनीवर औद्योगिक वसाहत उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याला चालना देण्यात येईल असे उद्योगमंत्री देसाई यांनी जाहीर केले. राजापूरमध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प , आयलॉग बंदर जेटी प्रकल्प आणि रिफायनरी प्रकल्प असे मोठे प्रकल्प येणार होते. स्थानिकांनी या प्रकल्पांना विरोध केल्याने हे प्रकल्प आतापर्यंत मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी नव्या एमआयडीसीला हिरवा कंदील दाखवला तरी त्यामध्ये कोणते उद्योग येणार हा प्रश्नच आहे.
www.konkantoday.com