
पूरग्रस्तांसाठी जिल्हा बँक दहा लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे स्वाधीन करणार
सहकाराबरोबर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने दहा लाखाचा धनादेश पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या स्वाधीन केला जाणार आहे.हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय बँकेने घेतला असून रत्नागिरी दौर्यावर येणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे या निधीचा धनादेश बँकेचे अध्यक्ष डॉ तानाजीराव चोरगे व उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव व अन्य संचालक सुपूर्द करणार आहेत. मध्यंतरी अतिवृष्टी व महापुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. यासाठी पूरग्रस्तांसाठी सर्वांनी मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.त्याला जिल्हा बँकेने प्रतिसाद दिला आहे.चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून घरे उद्ध्वस्त झाली त्यासाठी बँकेने पंचवीस लाख रुपये खर्च करून तेथील लोकांना कंटेनर उपलब्ध करून दिले आहेत.याशिवाय तिवरे गावातील शेतकऱ्यांचे कर्ज देखील बँकेने माफ केले आहे.
www.konkantoday.com