अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे प्रशासन सज्ज
अंगारकी चतुर्थी यात्रेनिमित्त गणपतीपुळे येथे मोठया प्रमाणावर भाविक येतात या भाविकांना सुविधा मिळावी यासाठी नुकतीच नियोजन बैठक तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
यावेळी विविध समस्यांचा आढावा घेण्यात येवून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या.या अंगारकी यात्रेसाठी कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, कराड आदी भागातील भाविक मोठय़ा प्रमाणावर येतात त्यांच्या गाडय़ा एसटी स्टॅड जवळील पार्किंगमध्ये उभे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाविकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राची टीमही या परिसरात कार्यरत राहणार आहे. दर्शनासाठी आलेले भाविक मोठया प्रमाणावर समुद्रात पोहण्यासाठी जात असल्याने त्या ठिकाणी बुडण्यासारख्या दुर्घटना होऊ नये यासाठी एमटीडीसी व ग्रामपंचायतीच्या वतीने सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.यावेळी भाविकांची गर्दी पाहता गणपतीपुळे मंदिरात पहाटे ३-३०दर्शन घेता येणार आहे.यावेळी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे चे सरपंच डॉक्टर विवेक भिडे, डॉक्टर श्रीराम केळकर,गणपती पुळेचे सरपंच महेश ठावरे,जयगडचे पोलिस निरीक्षक, ग्रामपंचायत सदस्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com