जिल्हा रुग्णालयाला भाजप आमदार प्रसाद लाड यांची अचानक भेट,समस्या जाणून घेतल्या
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयांबाबत पाहणी करण्याकरिता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्या वेळी त्यांचे सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन व अन्य पदाधिकारी होते.सध्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांना अनेक गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे.रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णांना बेड कमी असल्याने रुग्ण लादीवर झोपून उपचार घेत आहेत. रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग व वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्याचाही परिणाम रुग्णांवर होत आहे.आ.लाड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या रुग्णालयाच्या समस्या जाणून घेतल्या याबाबत त्यानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांच्याशीही चर्चा केली. www.konkantoday.com