16 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दोन आठवड्यांमध्ये कोकण रेल्वेतर्फे स्वच्छता पंधरवडा
सोळा तारखेपासून प्रभात फेरी, स्वच्छता अभियान,लोकजागृती करण्यासाठी सेमिनार व कार्यशाळा यांचे आयोजन,प्लास्टिक मुक्तीची आवश्यकता व प्लास्टिकचे दुष्परिणाम याबाबत जनजागृतीचा कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, विभागांतर्गत स्वच्छता स्पर्धा, निरनिराळ्या सामाजिक संस्थांचा जनजागृतीच्या हेतूने सहभाग असा भरगच्च कार्यक्रम कोकण रेल्वेतर्फे राबवण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS व कोकण रेल्वेचा कर्मचारी वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण,खेड, रत्नागिरी या तीन स्टेशन्सवर पथनाट्याचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येत आहेत.
प्लास्टिक मुक्ती चा एक भाग व जनजागृती या हेतुने प्लास्टिकला उपलब्ध असलेले पर्याय, व त्यापासून पासून बनवलेल्या वस्तू यांचे एक छोटेखानी प्रदर्शन देखील निराळ्या स्टेशनवर या कालावधीत भरवण्यात येईल.
प्लास्टिक मुक्ती साठी एक निर्णायक पाऊल म्हणून 2 ऑक्टोबर पासून सर्व रेल्वेस्टेशन्सवर केवळ एकदाच वापरल्या जाणाऱ्या व पुनर्प्रक्रिया न करता येऊ शकणाऱ्या प्लॅस्टिकच्या अनेक उत्पादनांवर बंदी देखील येऊ शकते, व त्यादृष्टीने विचारविमर्श चालू आहे. प्लास्टिक मुक्ती ही प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी कोकण रेल्वे तर्फे सर्व स्टेशनवरील स्टॉलधारक, कॅन्टीन चालक व फिरते विक्रेते यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहयोगाने वरील उपक्रम राबवण्यात येतील.या दोन आठवड्यांच्या अभियानाअंतर्गत, व नंतर देखील, रत्नागिरीतील अग्रणी सामाजिक संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे.असे कोकण रेल्वेतर्फे सांगणयात आले.
www.konkantoday.com