मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठीच ही यात्रा -युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे
लोकसभा निवडणुकीत सर्व देश भगवा झाला कोकणातील जनता नेहमी शिवसेनेच्या मागे उभी राहिली आहे.जन आशीर्वाद यात्रा ही विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निघालेली नाही तर महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला भरभरून दिले आहे.त्यांचे आभार मानण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरत आहे असे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी येथेल हातखंबा येथे झालेल्या सभेत बोलताना केले.
ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा रात्री रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे आली त्यावेळी तेथे त्यांचे मोठे उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर,म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत,रवींद्र माने, सुभाष बने,राजेंद्र महाडिक यांचेसह शिवसेनेचे अनेक नेते आदी मान्यवर उपस्थित होते.नवा महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न प्रत्येकाचे आहे हे स्वप्न साकारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उद्याचा महाराष्ट्र बेरोजगारी,कर्जमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त व सुजलांम सुफलाम व भगवामय करण्यासाठी आपण सर्वांनी पाठीशी उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले.आज या यात्रेच्या निमित्याने महाराष्ट्रात फिरत आहे. शिवसेनेवर प्रेम करणारे सर्वजण माझे मोठे स्वागत करीत आहेत.सर्वसामान्य लोकांचे प्रश्न व आवाज ऐकण्यासाठी आपण घराघरात जात आहे.आज काही राजकीय पक्ष निवडणुका आल्या की लोकांच्या कडे येतात परंतु शिवसेना हा असा एक पक्ष आहे की निवडणूक नव्हे तर लोकांचे प्रश्न सतत सोडवण्यासाठी झटत असतो सत्ता असो किंवा नसो शिवसेनेच्या शाखेत सामान्य माणूस आपले प्रश्न घेऊन येतो त्यावेळी ते सोडवले जातात असा विश्वास त्यांना आहे. ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण आहे. शिवसेनेकडे प्रश्न घेऊन लोक येतात त्यावेळी त्याचा कोणता पक्ष आहे हे पाहिले जात नाही यामुळेच आज सामान्य जनता शिवसेनेच्या मागे उभी राहिली आहे. विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ कोणता यावर चर्चा सुरू आहे परंतु महाराष्ट्र राज्य हा माझा मतदारसंघ आहे.असही त्यांनी सांगितले कोकणातील जनतेने कायमस्वरूपी शिवसेनेला साथ दिली आहे.त्यामुळे कोकण भगवामय झाले आहे.
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे स्वागत म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केले तर युवा सेनेच्यावतीने केतन शेटे व सहकाऱ्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले.
www.konkantoday.com