ग्राहकाच्या लॅपटॉप कुरिअर कर्मचाऱ्याने लंपास केला

रत्नागिरी येथील तेज कुरिअर कंपनीतील एका कर्मचाऱ्याने पार्सलमधील लॅपटॉप ग्राहकाला देण्याऐवजी स्वतः लंपास केल्याचा प्रकार उघड झाला आहे.नंदकुमार वारंग असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.यातील वारंग याची तेज कुरिअरमध्ये पार्सल घेऊन जाण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती त्याचे कडे कुरिअर कंपनीच्यावतीने पाच जुलै रोजी हातखंबा येथे लॅपटॉपचे पार्सल सिंधुदुर्गातील तरेळे कार्यालयात देण्यासाठी त्याच्या ताब्यात देण्यात आले होते.परंतु हे लॅपटॉपचे पार्सल वारंग याने कार्यालयात जमा केले नाही.याबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली शेवटी त्याने हे लॅपटॉप पार्सल आपण घेतल्याचे कबूल केले.याबाबत कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाने शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button