
गुहागर मतदारसंघात भाजपाकडून अश्विनीताई खानविलकर उमेदवारी मागणार
गुहागर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार की शिवसेनेच्या यावरून सध्या वाद सुरू आहे.गुहागर मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार विनय नातू हे इच्छुक आहेत.त्या दृष्टीने ते काही वर्षे प्रयत्न करीत आहेत. यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा असा रेटा लावला आहे.असे असतानाच आता गुहागर मतदारसंघातून भाजपकडून भाजपा महिला मोर्चाच्या मुंबई सचिव अश्विनी खानविलकर यांनी आपण उमेदवारी मागितल्याचे जाहीर केले आहे.आपण या मतदार संघात व मुंबई आणि कोकण येथे काम करीत असून या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.त्या दृष्टीने आपण निवडणुकीच्या तयारीलाही लागलो आहोत असेही त्यांनी सांगितले.आता युतीच्या बोलणीत ही जागा भाजपला आली तरी या ठिकाणी इच्छुकांची संख्या वाढल्याने पेच निर्माण होणार आहे.
www.konkantoday.com