गुहागर मतदारसंघातून शिवसेनेकडून भास्कर जाधव ,जन आशीर्वाद यात्रेत सूतोवाच?
गुहागर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेचा केला असला तरी ही जागा शिवसेना आपल्याकडेच ठेवणार असे दिसत आहे.एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या वतीने भास्करराव जाधव यांची उमेदवारीही निश्चित समजली जात आहे.आज जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने दौऱ्यावर आलेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपण भास्करराव जाधव यांच्या प्रचारासाठी गुहागरमध्ये येणार असून विजयी मेळाव्यासाठी ही हजर राहणार असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले.या वेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही आपण जाधव यांच्या प्रचारासाठी गुहागरात येणार असल्याचे सांगितले.यामुळे भाजप नेत्यांनी गुहागरच्या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली असली तरी ही जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com