कचरा प्रश्नावरून आता नगर परिषद नागरिकांना दंड व शुल्क वसूल करून भरडून काढणार

रत्नागिरी नगर परिषदेला स्वच्छता मोहिमेत सहकार्य करणाऱ्या नागरिकांना आता शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे वेठीस धरले जाणार आहे एकीकडे कचऱ्याबाबत नियम तोडणाऱ्यांना नागरिकांना शंभर रुपयांपासून एक हजारपर्यंत तर काही ठिकाणी पाच हजार रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार असून दुसरीकडे सुका व आेला कचरा गोळा करण्याच्या संकलनासाठी आता प्रत्येक घर ,सदनिका, लॉजिंग बोर्डिंग रेस्टॉरन्ट स्टॉल्स व फेरीवाले यांच्याकडून दर महिना शुल्क आकारले जाणार आहे तसेच घराच्या दुरुस्ती काम करता तुम्ही सिमेंट मातीचा ढीग (राडा रोडा) शिल्लक राहिल्यास तो नगर परिषदेच्या ठरवून दिलेल्या जागी स्वखर्चाने नेऊन द्यायचा आहे अन्यथा त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे
वास्तविक कचऱ्यासारखा प्रश्न नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असताना नगर परिषदेच्या प्रशासनाने याबाबत लेखी कोणतेही निवेदन न करता व नागरिकांना विश्वासात न घेता केवळ वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करून दंडाची व कर वसुलीच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत नगर परिषदेने दिलेल्या जाहीर सूचनेत शहरात केंद्र शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे घनकचरा व्यवस्था नियम लागू केले आहेत त्यामुळे ते नियम न पाळणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दंडाची रक्कमेचे दरपत्रक जाहीर केले आहे यामध्ये घनकचऱ्याचे वर्गीकरण प्रमाणे साठवणूक न करणे नगरपरिषद कर्मचारी ठेकेदार यांच्याकडे विहित वेळेत कचरा सुपूर्द न करणे घनकचरा गटारात वहाळात टाकणे जैववैद्यक घनकचरा विल्हेवाटीचा भंग करणे खाजगी बाजार आणि प्राणी व पक्ष्यांच्या कत्तल विल्हेवाटीचा भंग उद्योगापासून निर्माण होणारा घनकचऱ्याच्या विल्हेवाटीचा भंग मोठय़ा प्रमाणावर घनकचरा निर्माण करणाऱ्या संस्थांकडून विल्हेवाटीचा भंग प्राणी व जनावरे यांच्यापासून उपद्रव झाल्यास व्यावसायिक वापराकरिता वापर होणाऱ्या प्राणी व जाणारे पासून उपद्रव झाल्यास फेरीवाले भाजीवाले यांनी बंदिस्त कचरा दाण्यांत न ठेवल्यास बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवल्यास सार्वजनिक रस्ते गटारांमध्ये डेबीजचे ढीग टाकल्यास अशांपैकी भंग केल्यास काही ठिकाणी शंभर ते एक हजार तर काही ठिकाणी पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत तर काही ठिकाणी पाचशे ते हजार रुपया पर्यंत दंड ठोठावलेजाणार आहेत प्लास्टिक पिशव्यांचे आयात संग्रह व वस्तूंची विक्री केल्यास पाचशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत प्लॅस्टिकचा पिशव्यांचा वापर केल्यास शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत घनकचरा जाळण्यास पाच हजार ते पंचवीस साधा रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे यामुळे यापुढे शहरात कचऱ्याबाबत काही घडल्यास केवळ नागरिकच जबाबदार असणार आहेत आणि प्रशासन मात्र दंड वसुलीचे काम करणार आहे एकीकडे नागरिकांकडून दंड वसुलीचा दरपत्रक जाहीर करणाऱ्या नगर परिषदेने आता नगर परिषद घंटागाडीद्वारे द्वारे गोळा करत असलेल्या ओला व सुका कचरा संकलनाचे पैसेही नागरिकांच्या खिशातूनच वसूल केले जाणार आहेत याला देखील शासनाच्या अधिसूचनेचा आधार देण्यात आला आहे व याला उपयोगकता शुल्क असे नाव देण्यात आले आहे यामध्ये लॉजिंग बोर्डिंग रिसॉर्टसाठी शंभर रुपये प्रति महिना रेस्टॉरंटसाठी शंभर रुपये प्रति महिना स्टॉलसाठी तिस प्रतिमहिना फेरीवाले तीस रुपये प्रति महिना तर निवासी सदनिकांसाठी प्रत्येक फ्लॅट मागे तीस रुपये तर स्वतंत्र घरासाठी तीस रुपये प्रति महिना असा आकार करण्यात येणार आहे यासाठी नगरपरिषद कर्मचारी नेमणार असून त्याकडे नागरिकांनी कर भरावयाचा आहे हे सर्व केंद्र शासनाच्या अधिसूचना एसओ १३५७(इ)घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार होत असल्याचे नगर परिषद प्रशासनाने जाहीर केले आहे यामुळे आता रत्नागिरी शहरातील नागरिकांनी नगर परिषदेचा कारभार कसाही असला तरी शुल्क भरण्यास व नागरिकांकडून काही चूक झाल्यास दंड भरण्याची तयारी ठेवावी हे निश्चित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button