सामाजिक कार्यकर्ते राजू भाटलेकर यांची जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड
रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते पर्यटन व सामाजिक क्षेत्रात काम करणारे राजू भाटलेकर यांची जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीत अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
स्वाईन फ्ल्यू,मलेरिया व इतर साथरोग किंवा तत्सम रोगांवर आळा बसवण्याच्या दृष्टीने शासकीय आरोग्य सेवा समिती व खाजगी रुग्णालय यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत च्या रचनेत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी भाटलेकर यांची नियुक्ती होण्यासाठी शिफारस केली होती. त्याप्रमाणे भाटलेकर यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्ती पत्र भाटलेकर यांना देण्यात आले.या सदस्य पदाची मुदत तीन वर्षांकरिता आहे. भाटलेकर यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com