
शिवाजी स्टेडियममधील अकरा गाळे नगरपरिषद ताब्यात घेणार ?
रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधील अकरा गाळ्यांची मुदत तीन वर्षांपूर्वी संपली आहे. परंतु संबंधितांकडून त्यांचा वापर सुरू आहे.नगरपालिका नियमबाह्य भाडे भरून घेत आहे. यामुळे संबंधितांना नोटिसा काढून हे गाळे सील करा अशी सूचना नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी प्रशासनाला दिल्या. नुकतीच नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी नगरसेवक निमेश नायर यांनी हा विषय उपस्थित केला. गाळ्यांची मुदत संपूनही नगरपालिकेने गाळे ताब्यात का घेतले नाहीत.नगर परिषद कोणत्या अधिकारात भाडे भरून घेत आहे.या गाळ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे का.असे प्रश्न उपस्थित केले.याबाबत राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर यांनी देखील हे गाळे नगरपरिषदेच्या मालकीचे आहेत त्यामुळे यावर कारवाई करण्यासाठी कुणाला विचारण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नगराध्यक्षांनी प्रशासनाला याबाबत कारवाई करण्याच्या सूचना केले आहेत.
www.konkantoday.com