शाळेला शिक्षक मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले
संगमेश्वर तालुक्यातील आदर्श केंद्र शाळा शृंगारपूर या शाळेत मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या शाळेलाच शेवटी टाळे ठोकले या शाळेत सातवी पर्यंतच्या ४१ विद्यार्थी असून त्यासाठी ४ शिक्षक मंजूर आहेत. प्रत्यक्षात जूनपासून तेथे दोन शिक्षक काम करीत होते त्यानंतर गणपती सुट्टीनंतर या दोन्ही शिक्षकांची बदली झाली यामुळे या शाळेला शिक्षक नसल्याने आजूबाजूच्या शाळांतील शिक्षक तात्पुरते येऊन मुलांना शिकवत होते.यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे दाद मागूनही कुणीही लक्ष दिले नाही यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शेवटी शाळेला टाळे ठोकले.
www.konkantoday.com