
पैशाच्या हव्यासापायी चोऱ्या करीत राहिले ,शेवटी जाता जाता पोलिसांच्या जाळ्यात सापडले
गणपती सणाच्या गर्दीचा फायदा घेऊन जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला हव्यासामुळे शेवटी पोलिसांच्या बेड्या पडल्या.रत्नागिरी पोलिसांच्या जागरूकतेमुळे धुमाकुळ घालणारी ही टोळी पोलिसांच्या ताब्यात आली आणि त्यांच्याकडून ३२लाखांचा ऐवज जप्त केला त्या मध्ये २६ मंगळसूत्रे,११ सोन्याचे हार,९चैन, ३४ कानातील जोड,६ कानातील चैन जोड, २५ सोन्याच्या अंगठ्या ७ सोन्याची पाने व अन्य दागिन्यांसह अडीच लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवा राम साखरे,ज्योती शिवा साखरे,अंजू उर्फ पद्मा शिवा शेट्टी,विजय उर्फ नरेश उर्फ राहुल धारी यांना अटक केले. यातील आरोपी औरंगाबाद वाशिम विभागातील आहेत.
गणपती सणासाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येतात आणि त्या वेळी बसस्थानक व रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते याचा फायदा उठवण्यासाठी हे चोरटे रत्नागिरी जिल्ह्यात आले होते.मागील दहा दिवसात या चोरट्यांच्या टोळीने रत्नागिरी जिल्ह्य़ात अक्षरश धुमाकूळ घातला जिल्ह्यातील चिपळूण, खेड, देवरूख बस स्टेशनवर तसेच रेल्वे स्टेशनवर देखील महिलांच्या पर्समधील दागिने लांबविण्याचे सत्र त्यांनी सुरू ठेवले.चोऱ्या करूनही ते पोलिसांच्या हातात येत नसल्याने त्यांचा हव्यास वाढत गेला.दरम्यान रत्नागिरी पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे ,अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी या चोरी प्रकरणाचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना व त्यांच्या पोलीस निरीक्षकांना तसेच स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी गेल्या दहा दिवसांत झालेल्या चिपळूण,खेड,देवरूख बसस्थानक व रत्नागिरी रेल्वे स्टेशनमधील गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथके तयार करून चोरांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली.यासाठी त्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले तसेच एसटी स्टँड व रेल्वे स्टेशन या ठिकणी साध्या वेशातील पोलिसांनी गस्त ठेवली होती. रत्नागिरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनिल लाड यांनी देखील एक पथक तयार करून गुन्हेगारांचा शोध चालू केला होता.या पथकाने बसस्थानक व रेल्वे स्टेशनवर बारीक नजर ठेवली होती. रत्नागिरी रेल्वे स्थानकात या पोलिसांची गस्त चालू असताना रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्म वर मुंबईला कडे जाणाऱ्या गाडीची वाट पहात असताना दोन स्त्रिया,दोन पुरुष व एक लहान मुलगा सामानासह बसलेले दिसले.पोलिसांना पाहताच ते चलबिचल झाले.या लोकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी जवळ जाऊन ते कुठून आले कुठे जाणार याची चौकशी सुरू केली मात्र भांबावलेल्या या लोकांनी उलटसुलट उत्तरे देण्यास सुरुवात केली.पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत त्यांच्या बॅगांची तपासणी सुरू केली आणि चोरीच्या दागिन्यांचे मोठे घबाड पोलिसांच्या हातात मिळाले.त्यांच्या बॅगेत सोन्याचे दागिने,चांदीचे दागिने,मनगटी घडय़ाळे,मोबाइल सेट सापडले.याशिवाय लोखंडी कटर आदि हत्यारेही सापडली. त्यामुळे ही माणसे आरोपी आहेत हे निश्चित झाल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.रत्नागिरीत झालेल्या विविध बसस्थानक व अन्यठिकाणी झालेल्या चोऱ्यांची कबुली आरोपींनी दिली.पाचही गुन्ह्यातील शंभर टक्के ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला.पहिली चोरी पचल्यानंतर आणखी पैशाच्या हव्यासापोटी हे टोळके चोऱ्या करीत राहिले आणि घरी जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांच्या ताब्यात सापडले.या सराईत चोरांच्या टोळक्याने रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच बाहेरच्या जिल्ह्यात देखील अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता आहे.त्यादृष्टीने पोलीस आता तपास करीत आहेत.रत्नागिरी पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक श्री शिरीष सासने,रत्नागिरी शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अनिल लाड, सहाय्यक पोलीस फौजदार तानाजी मोरे, सुभाष माने,पांडुरंग गोरे,पोलीस कॉन्स्टेबल संदीप कोळंबेकर, संजय कांबळे,शांताराम झोरे,राकेश बागुल, मिलींद कदम,सुभाष भागणे,संजय जाधव, राजेंद्र भुजबळराव, स्नेहल मयेकर,अपूर्वा बापट,विद्या लांबोरे, नितीन डोमणे,विजय आंबेकर,अरुण चाळके, सागर साळवी,रमिज शेख,अमोल भोसले, उत्तम सासवे,गुरू महाडिक,दत्ता कांबळे, संदीप मालप,वैदेही कदम,मधुरा गावडे, सांची सावंत यांचेसह रत्नागिरी शहर पोलिस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल विकास चव्हाण,नितीन जाधव, रोशन सुर्वे,नंदकुमार सावंत या सर्वांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी पार पडली.
www.konkantoday.com