जिल्हा परिषदेच्या ३८ सदस्यांनी जि.प सीईओ अांचल गोयल यांचे वर अविश्वास ठराव आणण्यासाठी निवेदन दिले
रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अांचल गोयल यांच्यावर अविश्वास ठरावाची पूर्वतयारी सेना सदस्यांनी सुरू केली आहे.याबाबतचे सेना सदस्यांनी एक निवेदन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ स्वरूपा साळवी यांच्याकडे सुपूर्द केले. मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामीण भागातील विकासाचे प्रस्ताव वेळेवर मंजूर करीत नसल्याने त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय शिवसेना सदस्यांनी घेतला आहे.या निवेदनावर ३९ सदस्यांपैकी ३८सदस्यांनी सह्या केल्या आहेत हे निवेदन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष साै स्वरूपा साळवी यांना देण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष गोवळे बांधकाम आरोग्य सभापती, विनोद झगडे ,उदय बने,संतोष थेराडे, बाळशेठ जाधव,बाबु म्हाप यावेळी उपस्थित होते. शिवसेनेच्या भूमिकेला जि.पमधील अन्य पक्षांच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला आहे.
www.konkantoday.com