गुहागर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून तीन उमेदवार इच्छुक
राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांचे समर्थकही मोठया प्रमाणावर शिवसेनेत गेले आहेत.जाधव हे शिवसेनेत गेले असले तरी राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता घडाळ्याची साथ सोडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले.गुहागर मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तीन उमेदवार इच्छुक असल्याचेही त्यानी सांगितले.भास्कर जाधव यांना पक्षाने मंत्रिपदापासून मोठमोठी पदे दिली होती तरी ते पक्ष सोडून शिवसेनेत का गेले याचे त्यानी कारण स्पष्ट केले नाही.भास्कर जाधव यांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयाने आपल्याला दुःख झाल्याचेही जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले.
www.konkantoday.com