
संगमेश्वर येथे विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील किरडुवे येथे पोहण्यास उतरलेले दोन तरुण बुडून मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे.किरडुवे गावातील स्वप्निल पांचाळ, संजय बाईत हे दोघे जण विहिरीत पोहण्यासाठी आले होते.यातील स्वप्नील हा पोहण्यासाठी विहिरीत उतरला तो बुडू लागला म्हणून त्याला वाचवण्यासाठी संजयने विहिरीत उडी मारली परंतु ते दोघेही बुडाल्याने मृत्युमुखी पडले.
www.konkantoday.com