काँग्रेसने निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली


लोकसभा निवडणुकीपूर्वी हायकमांडवर टीका करून पक्षशिस्त मोडल्याबद्दल संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. काँग्रेसने निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.महाराष्ट्र काँग्रेसने पाठवलेल्या प्रस्तावावर तातडीने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मंजुरी दिली आणि त्यानंतर पक्षाकडून पत्रक काढून संजय निरुपम यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर करण्यात आला. आता यावर संजय निरुपम यांचे स्पष्टीकरण आले आहे. ‘मी आधी राजीनामा दिला, मग पक्षाने माझ्यावर कारवाई केली’, असा दावा त्यांनी केला
संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी आज सकाळी X वर लिहिले की, काल रात्री मी माझा दिला. माझ्या राजीनाम्याचे पत्र मिळाल्यानंतर मग काँग्रेस पक्षाने माझी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. इतकी तत्परता पाहून छान वाटले. फक्त ही माहिती शेअर करत आहे. मी आज सकाळी 11.30 ते दुपारी 12 या वेळेत सविस्तर निवेदन देईन.
www.konkanyoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button