वाटद येथे एमआयडीसी उभी राहिल्यास दोन हजार तरुणांना रोजगार
रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे एमआयडीसी उभी राहिल्यास याठिकाणी येणाऱ्या उद्योगांमधून दोन हजार तरुण तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध होईल अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिली.
येथील बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रकल्प येणे आवश्यक आहेत. मात्र या ठिकाणी येणारे प्रकल्प प्रदूषण विरहित असावे असा आपण आग्रह धरणार आहोत.येणाऱ्या सरसकट प्रकल्पाला विरोध करणे योग्य नाही.एमआयडीसी उभे करताना स्थानिकांना विश्वासात घेतले जाईल या ठिकाणी येणाऱ्या प्रकल्पात ८० टक्के स्थानिक तरुणांनाच प्राधान्य दिले पाहिजे असा आग्रह आपण शासनाकडे धरणार आहे.
www.konkantoday.com