राजश्री विश्वासराव यांची महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती
मुंबई : सामाजिक, राजकीय व्यक्तिमत्व आणि उद्योजिका अशी ओळख असलेल्या राजश्री (उल्का) विश्वासराव यांची महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य वनविभागाचे सहसचिव संजय दोडाल यांनी याबद्दलच्या स्वाक्षरी केली आहे. राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली ही अधिसुचना जारी करण्यात आली आहे.”राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह एकत्र येत महाराष्ट्र वनविकास मंडळावर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधानी आहे.”, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. त्यांच्या नियुक्तीनंतर वनमंत्र्यांसह माजी आमदार बाळ माने यांनी विश्वासराव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.समर्थ एडव्हटाईझर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक आणि अध्यक्ष असलेल्या राजश्री विश्वासराव यांनी एक उद्योजिका म्हणून आपल्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. मुळच्या कोकणातील असल्याने समर्थ वुमन वेलफेअरच्या माध्यमातून स्त्री सशक्तीकरणाच्या दृष्टीकोनातून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर या क्षेत्रात सरकारच्या मदतीने विविध उपक्रम राबवणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.