रत्नागिरीत होणार्या मुख्यमंत्र्यांच्या महा जनादेश यात्रेची तयारी जोरात सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महा जनादेश यात्रा रत्नागिरीमध्ये १७ सप्टेंबर रोजी होत आहे.शिवाजी स्टेडियम येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे माननीय मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेचे नियोजन करण्यासाठी भाजपा रत्नागिरी शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.यावेळी मा.जिल्हाध्यक्ष अॅड.दिपक पटवर्धन,प्रदेश कार्यकारीणी सदस्य मा.श्री.सचिन वहाळकर यांनी महाजनादेश सभेच्या नियोजनासाठी मार्गदर्शन केले.यावेळी बहूसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते,तसेच ३७० कलम जनजागरण समितीत अॅड.बाबा परूळेकर यांची रत्नागिरी जिल्हा संयोजक म्हणून नियुक्ती केल्याचे माननीय जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केले.
यावेळी शहराध्यक्ष मा.प्रशांत डींगणकर,जिल्हाउपाध्यक्ष मा.राजेश सावंत,डाॅ.सुभाष देव,सौ.एेश्वर्या जठार,युवामोर्चा शहरध्यक्ष मंदार मयेकर यासोबतच सर्व नगरसेवक तसेच ग्रामदेवत भैरी देवस्थानचे अध्यक्ष मा.मुन्ना सुर्वे,श्रीराम भावे व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थीत होते.यावेळी सर्वांनी सभा यशस्वी करण्याचा निर्धार केला.
www.konkantoday.com