
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या रत्नागिरी कार्यकारिणीची निवड जाहीर
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यपदी निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही भादुले, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सागर ढोमकर, जीएसटी उपायुक्त संतोष डाफळे यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील अधिकार्यांची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष समीर भाटकर, सहचिटणीस सुदाम टाव्हरे, राज्य संघटक रमेश जंजाळ तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या संघटनेच्या कार्याध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) शेखर सावंत यांची निवड करण्यात आली. तर सरचिटणीसपदी उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी, महिला उपाध्यक्षपदी जिल्हा प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर, सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता वीणा पुजारी यांची निवड करण्यात आली.
खजिनदार म्हणून अपर जिल्हा कोषागार अधिकारी रवींद्र मोरे यांची निवड झाली. समितीचे सदस्य म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, दापोली उपविभागीय अधिकारी शरद पवार, चिपळूण उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड, नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त तुषार बाबर यांची तर सदस्य सचिव म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) राहुल देसाई यांची निवड करण्यात आली. तसेच समितीचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणून अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जि.प.चे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव हे काम पाहणार आहेत.