
जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्ट कडून युरिया व साखरेची सर्वात मोठी शिपमेंट
जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्ट व भारतातील आघाडीची खाजगी पोर्ट ऑपरेटर कंपनी यांच्यावतीने प्रथमच युरियाची आयात आणि साखरेची सर्वात मोठी निर्यात असणारी शिपमेंट यशस्वीरित्या पार पडली या पोर्टमधून साखरेची करण्यात आलेली निर्यात ही देशातील मोठ्या पोर्ट पैकी सर्वात मोठी शिपमेंट होती. साखरेची शिपमेंट ही मोसमातील सर्वात मोठ्या कार्गोमधून करण्यात आली. जेएसडब्ल्यूचा जयगड पोर्ट महाराष्ट्र, तेलंगणा,गोवा, कर्नाटक आणि इपतर राज्यातील महत्त्वाच्या विभागाशी जोडला गेला आहे. पुढील काही महिन्यात या पोर्टमधून आणखी युरिया शिपमेंट चे काम केले जाणार आहे.
www.konkantoday.com