
काँग्रेस चा जुना कार्यकर्ता पक्षासोबत -विजय भोसले
आज राजकीय उलथापालथी होत असल्या तरी काँग्रेसचा जुना कार्यकर्ता पक्षासोबत आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे नूतन अध्यक्ष विजय भोसले यांनी केले
केंद्रात राज्यात काँग्रेसची सत्ता नसली तरी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते काँग्रेससोबत आहेत पक्षाच्या पडत्या काळात आपण जिल्हाध्यक्षपद स्वीकारले आहे सर्वांना बरोबर घेऊन आपण जिल्ह्यात पुन्हा पक्षाला उभारी आणणार आहोत असे भोसले यांनी सांगितले केंद्रात सध्या असलेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जिल्ह्यात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले विधानसभा निवडणुकीत आघाडीबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील परंतु आघाडी झाल्यास राजापूर विधानसभा मतदार संघावर काँग्रेस दावा करणार असल्याचेही त्यांनी सांगतले.
www.konkantoday.com