शिक्षक संघटनाही जि.प सीईओंवर नाराज ,पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकणार
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ आचल गोयल यांच्यावर आज अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिवसेना भाजप व सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला असतानाच जिल्हा परिषदेच्या शिक्षक संघटना या देखील गोयल यांनी संघटना पदाधिकाऱ्यांना दिलेल्या वर्तणुकीमुळे नाराज आहेत.आज नवीन शिक्षकांचा समुपदेशन वर्ग घेण्यात आला. शिवसेनेने हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्यामुळे या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या ठिकाणी गेलेल्या शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांना सभागृहातून पोलिसांकरवी बाहेर काढण्यात आले. पदाधिकाऱ्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे सर्व शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.यामुळे १३ तारखेला होणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्व शिक्षक संघटनांनी घेतला असल्याची माहिती पत्रकारांना शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या सोहळ्याला पुरस्कार मिळालेले शिक्षकही जाणार नसल्याचे संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
www.konkantoday.com