मच्छीमारांची मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
शासनाची बंदी उठूनही अतिवृष्टी व वादळी वातावरणामुळे मच्छीमार मच्छीमारी करण्याकरिता समुद्रात जाऊ शकत नाहीत तसेच वादळी वातावरणामुळे समुद्रातील प्रवाह बदलल्याने धोका पत्करून गेलेल्या मच्छीमारांना मासळी देखील मिळणे कठीण होऊन बसले आहे. मच्छीमाराने मच्छिमारी नौकांच्या मोठय़ा प्रमाणावर कर्ज काढले आहे. याशिवाय खलाशांना नेमणुका करणे व कामासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. परंतु मच्छीमार समुद्रात जाऊ शकत नसल्याने त्यांना प्रचंड नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.
www.konkantoday.com