
जेके फाईल्स जवळील इंदुलकर एंटरप्राइस दुकानाला आग
रत्नागिरी शहरातील जे के फाईल्स जवळ असलेल्या इंदुलकर इंटरप्रायजेस या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचा प्रकार काल सायंकाळी घडला.रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यापारी केशव इंदुलकर यांच्या मालकीचे हे दुकान आहे.या आगीमुळे दुकानातील रंगाचे डबे ताडपत्री व प्लॅस्टिकच्या वस्तू जळून गेले आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने व स्थानिक लोकांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली.ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे.
www.konkantoday.com