चौपदरीकरणाच्या ठेकेदार कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या मोठ मोठय़ा खड्डय़ांमुळे अपघात वाढले आहेत.या खड्ड्यांमुळे चिपळूण परिसरातील चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे.या सर्वाला चौपदरीकरणाचे काम करणारे ठेकेदार कंपनी जबाबदार आहे.त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने चिपळूण पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले.या शिष्टमंडळात सभापती पूजा निकम, शौकतभाई मुकादम ,जयंद्रथ खताते,युवक जिल्हाध्यक्ष,राकेश चाळके,शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, सतीश खेडेकर, माजी जि.प.सदस्य दिलीप माटे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, महिला तालुका अध्यक्ष जागृती शिंदे व अन्य पदाधिकारी यांचा समावेश होता.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दिले आहे.
www.konkantoday.com