
अणुऊर्जा प्रकल्पातील प्रकल्पबाधित अठरा कर्मचाऱ्यांना कंपनीने कार्यमुक्त केले
राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील प्रस्तावित अणू ऊर्जा प्रकल्पातील अठरा प्रकल्पबाधित कर्मचार्यांना कंपनीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजापूर तालुक्यात जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.यासाठी माडबन, मिटबावणे, करेल ,निवेली या पाच गावातील जमिनी शासनाने संपादित केल्या.जमीन संपादन करताना प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका प्रकल्पग्रस्ताला नोकरीत सामावून घेण्यात आले होते. २०११पासून अठरा प्रकल्पग्रस्त कंपनीत नोकरीला लागले होते. या कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पगाराची स्लिप व अन्य सुविधा देण्यात येत नव्हत्या.आता या कर्मचार्यांना तुम्हाला कार्यमुक्त करीत असून नव्या आदेशाची वाट पाहा असे कंपनीकडून सांगण्यात आल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com